Advertisement

१ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी केंद्राच्या 'या' नव्या गाईडलाईन्स

प्रजापत्र | Wednesday, 27/01/2021
बातमी शेअर करा

नवी दिल्ली : देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या नव्या गाईडलाईन्सनुसार फेब्रुवारी महिन्यापासून सर्वसामान्य नागरिकांसाठी स्विमिंग पूल सुरु होऊ शकणार आहेत. त्याचबरोबर चित्रपट गृहांमध्ये प्रेक्षकांची संख्या वाढणार आहे. ही नवी गाईडलाईन्स येत्या १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या या गाईडलाईन्स देशातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होणार आहेत. नव्या गाईडलाईन्सनुसार कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जुन्या गाईडलाईन्सचे इतर नियमदेखील पाळावे लागणार आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.

Advertisement

Advertisement