Advertisement

 पुण्यात पोलिसांवर कोयत्याने हल्ला

प्रजापत्र | Monday, 03/03/2025
बातमी शेअर करा

चाकण : पुणे जिल्ह्यातील(pune police खेड तालुक्यातील चिंचोशी -केंदूर रस्त्यावरील चिंचोशी घाटात रात्री सव्वा बाराच्या सुमारास विविध गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी सचिन भोसले याला पकडण्यासाठी पिंपरी- चिंचवडचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांनी सापळा लावला होता. त्यावेळेस आरोपी भोसले याने (pune crime)उपायुक्त व सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्यावेळी स्वसंरक्षणार्थ पोलीस उपायुक्तांनी दोन (काडतुसे )गोळ्या त्यांच्या सर्व्हिस पिस्तूल मधून झाडल्या.त्यावेळेस एक काडतूस आरोपीच्या पायाला लागले व तो जखमी झाला. कोयत्याच्या हल्ल्यात पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड दोघेही जखमी झाले आहेत.

Advertisement

Advertisement