Advertisement

महिला,मुलांवरील गुन्हे रोखण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करणार : मुख्यमंत्री फडणवीस

प्रजापत्र | Saturday, 01/03/2025
बातमी शेअर करा

मुंबई- केंद्राच्या कायद्यात शक्ती कायद्यासंदर्भातील अनेक तरतूदी आहेत. त्यामुळे या कायद्यात आणखी काही बदल करता येतो का? हे पाहावे लागणार आहे. केंद्र सरकारने जो नवीन कायदा केला आहे. त्यात शक्ती कायद्यातील अनेक तरतुदी आधीपासून आहेत, त्यामुळे या संदर्भातील नवीन कायदा(police) आपल्याला करावा लागेल, अशी माहिती मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (दि.१) पत्रकारांशी बोलताना दिली.

ठाण्यात आज झालेल्या 'वरिष्ठ पोलीस अधिकारी परिषद-2025' मध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. विशेषतः तीन नवीन कायदे पारित झालेले आहेत. त्या कायद्यांचे महाराष्ट्रातील अंमलबजावणी संदर्भात सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते पुढे म्हणाले की, तीन नव्या कायद्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. यावेळी सायबर गुन्हे रोखण्यासाठी सादरीकरण करण्यात आले. महिला सुरक्षितेसंदर्भात चर्चा झाली. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी (Devendra Fadnavis)उपाययोजना करण्यात येणार आहेत. ड्रग्ज प्रकरणाची कारवाई कशी करता येईल, (Mumbai)तसेच ड्रग्ज प्रकरणात पोलिसांचा संबंध असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित पोलिसाला निलंबित न करता बडतर्फ केले जाणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राने जो महासागर प्लॅटफॉर्म तयार केला आहे. त्या संदर्भात सादरीकरण झाले. महिला आणि लहान मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि गुन्हे झाल्यानंतर लवकरात लवकर आरोप पत्र दाखल करण्याकरता काय करावे, यासंदर्भात चर्चा झाली. महिलांच्या संदर्भात (Crime)जे गुन्हे दाखल होतात. त्याबद्दल वेळेत आणि लवकरात लवकर चार्जशीट दाखल होणे, या संदर्भात आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार करत आहोत.
 

Advertisement

Advertisement