Advertisement

चंदुलाल बियाणीला आता सेलू पोलिसांनी घेतले ताब्यात

प्रजापत्र | Thursday, 27/02/2025
बातमी शेअर करा

 परभणी : ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने सेलू पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात (Rajasthani Multistate)राजस्थान मल्टिस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल बियाणीस बीड (Beed)कारागृहातून सेलू पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. (Chandulal Biyani)बुधवारी परभणी जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मुदत संपूनही पैसे परत दिले नसल्याने अभय सुभेदार (रा. सेलू) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून न्यायालयाच्या आदेशाने १० फेब्रुवारीला सेलू पोलिस ठाण्यात राजस्थानी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष (Chandulal Biyani)चंदुलाल बियाणी, उपाध्यक्ष बालचंद लोढा, सचिव बद्रीनारायण बाहेती, सहसचिव पी. डी. अग्रवाल, कोषाध्यक्ष विजय प्रकाश लड्डा, (selu shakha)सेलू येथील शाखाधिकारी नंदकिशोर सोमाणी अशा सहा जणांवर गुन्हा दाखल केला होता. पोनि. दीपक बोरसे, सपोनि. प्रभाकर कवाळे यांनी तपासादरम्यान अध्यक्ष (Chandulal Biyani)चंदुलाल बियाणी हे अंबाजोगाई येथील एका ग्राहक फसवणूक गुन्ह्यात (Beed)बीड येथील कारागृहात असल्याचे पुढे आले. आरोपी चंदुलाल बियाणीला २५ फेब्रुवारीला बीड कारागृहातून ताब्यात घेत अटक केली. (Rajasthani Multistate)बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजार केले असता, न्या. जी. जी. भरणे यांनी आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Advertisement

Advertisement