मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेच्या लाभार्थी महिलांना अखेर आजपासून फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याच्या वितरणासाठी अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाला ३४९० कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. (Mahila balvikas)महिला व बालविकास विभागाकडून दोन दिवसांपूर्वी तांत्रिक कारणामुळं हप्ता वितरीत करण्यात उशीर झाल्याचं सांगण्यात आलं होतं. आता आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेच्या महिला लाभार्थ्यांना १५०० रुपये मिळतील. मात्र(February) फेब्रुवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या घटणार आहे.
बातमी शेअर करा