परळी दि.२६(प्रतिनिधी) : ओम नमः शिवाय,हर हर महादेवचाजयघोष करत बुधवार (दि.२६) रोजी सकाळी १० वाजेपर्यंत हजारो शिवभक्तांनी देशातील बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या(Beed) बीड जिल्ह्यातील (Parli vaijnath)परळी वैजनाथ येथील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शन घेतले आहे. तसेच धर्मदर्शन रांगेत उभे टाकून दर्शन घेणाऱ्या भाविकांची वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्या पर्यंत रीघ लागली आहे. दर्शनासाठी भाविकांच्या महिला, पुरुष व पासधारक अशा तीन रांगा लावण्यात आल्या आहेत. (Mahashivratr)महाशिवरात्रीचे दर्शन घेण्यासाठी मंगळवार (दि.२५) रात्री बारा वाजल्यापासून भाविकांची गर्दी सुरू झाली आहे. (Beed)तर आज सकाळी सहानंतर या गर्दीत मोठी वाढ झाली आहे.श्री वैद्यनाथ मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीने फुलला आहे.
बातमी शेअर करा