अहिल्यानगर: अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये आज पहाटे कारचा भीषण अपघात(accident) झाला. भरधाव कार डिव्हायडरला धडकली अन् सीएनजीने (cng)पेट घेताच कार जळाली, यात दोन जणांचा होरपळून मृत्यु झाला. यात एका (police)पोलिस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
अधिक माहितीनुसार आज (दि.२४) सोमवार पहाटे (beed)बीडहून जामखेडच्या दिशेने येणारी कार (car)डिव्हायडरला धडकली. ही धडक इतकी जोरात होती की, बसल्यानंतर सीएनजीने पेट घेतला अन् कारला भीषण आग लागली. कारने रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या डिव्हायडरला धडक दिली, त्यानंतर १५० फूटावर कार फरफटत गेली होती. त्यामुळे सीएनजीने पेट घेतला, अन् कारमध्ये आग लागली.
या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यु झाला. मृतामध्ये जामखेड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महादेव दत्ताराम काळे आणि जामखेड पोलीस ठाण्यातील (police)पोलीस कॉन्स्टेबल धनंजय नरेश गुडवाल अशी मृताची नावे आहेत. सोमवारी पहाटे ४ वाजता अपघात झाला. आग इतकी भीषण होती, की कार जळून खाक झाली.कार अत्याधुनिक असल्यामुळे अपघातानंतर लॉक झाली, त्यामुळे आतमध्ये असणाऱ्या दोघांना बाहेर पडता आले नाही. कारबरोबर दोघेही जळून खाक झाले, त्यांना ओळखणेही शक्य झाले नाही. (mobile)मोबाईलवरून ओळख पटवण्यात आली.
अपघातात पोलीस कर्मचारी गुडवाल यांचा मोबाईल पडलेला होता, त्यामुळे ते एक असावेत व गाडी मालक काळे असे दोघे असावेत असा अंदाज पोलिसांनी लावला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत.