मुंबई -राज्य परिवहन विभागाने सर्व वाहनांवर हाय (HSRP Number Plate) सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याचे निर्देश दिले आहे. सर्व वाहनांवर आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे ज्या वाहनधारकांनी अजूनही एचएसआरपी नंबर प्लेट बसवले नाहीत त्यांना बसवावी लागणार आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. अन्यथा तुमच्याकडून १० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. याबाबत परिवहन शाखेकडून(parivahan shakha) इशारा देण्यात आला आहे.
१ एप्रिल २०१९ नंतरच्या वाहनांवर हाय सिक्यिरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP Number Plate)आधीच बसवलेली आहे. त्यामुळे या वाहनांना बसवण्याची गरज नाही. एचएसआरपी नंबर प्लेट्स या अॅल्युमिनियमपासून बनवलेल्या आहेत. त्यावर एक वेगळा रंग असता आणि युनिक आयडेंटिफिकेशन नंबरदेखील असते. या प्लेट्स लगेचच ओळखल्या जातात.सीसीटीव्ही (Cctv camera )कॅमेऱ्यात ही नंबर प्लेट लगेच ओळखली जाते. त्यामुळे वाहन चोरी रोखण्यास मदत होते, असे (parivahan)परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यामुळे राज्यात लाखो वाहनांना या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवाव्या लागणार आहेत.
तुम्हाला तुमच्या वाहनावर एचएसआरपी नंबरप्लेट लावणे गरजेचे आहे. जर दुचाकी आणि ट्रॅक्टरला नंबर प्लेट लावायची असेल तर ४५० रुपये आणि जीएसटी आकारला जाईल. तीनचाकी वाहनांना ५०० रुपये तर चारचाकी वाहने आणि इतर वाहनांना ७४५ रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. एचएसआरपी प्लेट बसवण्यासाठी तुम्हाला परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in/1035/Home वर भेट द्यावी लागणार आहे. त्यानंतर ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. यानंतर फिटमेंट सेंटवर अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे.यानंतर तुम्हाला अधिकृत विक्रेत्यांकडून एचएसआरपी नंबर प्लेट बसवावी लागणार आहे
वेबसाइटला गेल्यावर अप्लाय एचएसआरपी लिंकवर क्लिक करा. यानंतर कार्यलय निवडा. यानंतर तुमच्या कारबाबत सविस्तर माहिती भरा. यानंतर तुम्हाला मालकाचे नाव दिसेल. त्यानंतर तुम्ही केंद्रावर जाऊन किंवा होम डिलिव्हरीचा ऑप्शन निवडू शकता. यानंतर पैसे भरावे लागणार आहे. यानंतर तुम्ही ती नंबर प्लेट बदलून घ्या. तुम्ही निवडलेल्या फिटमेंट सेंटरवर जाऊन नंबर प्लेट बसवावी.