Advertisement

प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधीत वाढ

प्रजापत्र | Monday, 24/02/2025
बातमी शेअर करा

मुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) महाराष्ट्रातील घरमालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस सरकार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana)ग्रामीण भागातील घरांसाठी ५०,००० रुपयांचे अतिरिक्त अनुदान देणार आहे. त्यानंतर एकूण रक्कम प्रति घर २.१ लाख रुपये होईल. ही माहिती (Jaykumar Gore)राज्यमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे.

महाराष्ट्राचे ग्रामीण विकास(Jaykumar Gore) मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, (Devendra Fadnavis)'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला मान्यता दिली आहे. २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना ५०,००० रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाभार्थ्याला मिळणारी एकूण आर्थिक मदत २.१ लाख रुपयांपर्यंत पोहोचेल. या अतिरिक्त अनुदानाचा खर्च राज्य सरकार उचलेल.

Advertisement

Advertisement