Advertisement

पेपर फोडणाऱ्यांवर दादा भुसेंनी उगरला कायद्याचा दंडुका

प्रजापत्र | Saturday, 22/02/2025
बातमी शेअर करा

मुंबई-  दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठी विषयाचा पेपर फुटीवर शिक्षण (Education Minister Dada Bhuse)मंत्री दादा भुसे शिक्षण विभागाच्या कारभारावर चांगलेच संतापलेत.पेपर फुटीप्रकरणी अ‍ॅक्शन घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्यानंतर स्थानिक पातळीवर गुन्हा दाखल करण्यात आला. जालना इथल्या बदनापूर परीक्षा केंद्रावर मराठी पेपरफुटी प्रकरणात शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालन्यातील बदनापूर इथल्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर मराठी विषयाच्या पेपरफुटी प्रकरणी मल्टीसर्व्हिसेस चालककासह एका अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी फिर्याद दिली आहे. मराठी विषयच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे व्हाट्सअपवर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल (registered case) करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement