राज्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडल्याचे (SSC Exam Paper Leaked) दिसत आहे. पहिल्याच दिवशी दहावीचा पेपर फुटला आहे. जालना आणि यवतमाळमध्ये दहावीचा मराठीचा पेपर फुटला आहे. सोशल मीडियावर मराठीचा पेपर व्हायरल झाला आहे. जालन्यामध्ये पहिल्याच १५ मिनिटांत मराठीचा पेपर फुटला होता, त्यानंतर हा पेपर यवतमाळमध्येही व्हायरल जालाय.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे पहिल्याच दिवशी दहावीचा पेपर फुटला आहे. मराठीच्या पेपरच्या प्रश्नपत्रिकेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शिक्षण आणि महसूल विभागाकडून जिल्हा परिषद माध्यमिक(10th Board Exam Paper Leaked) विद्यालय महागाव आणि कोठारी येथील शाळेत चौकशी सुरू करण्यात आली आहे. यवतमाळमध्ये दहावीचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पेपरफुटीचे प्रकरण फक्त जालना आणि यवतमाळ पुरतेच मर्यादीत आहे की राज्य भरात हा पेपर पोहचलाय? याबाबत चर्चा सुरू आहे.दहावीच्या मराठी पेपरला सुरूवात झाल्यानंतर जालन्यातील बदनापूरमध्ये पहिल्या १५ मिनिटात पेपर फुटला. शहरातील झेरॉक्स सेंटरवर फक्त २० रूपयांत पेपर मिळत होता. हा पेपर त्यानंतर सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल जाला. जालन्यानंतर आता यवतमाळमध्येही पेपर फुटल्याचे समोर आलेय. राज्य सरकारच्या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालाय.