Advertisement

पीएम किसानचा हप्ता लवकरच खात्यावर!

प्रजापत्र | Tuesday, 18/02/2025
बातमी शेअर करा

दिल्ली -भारत सरकार (pm kisan yojana )शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असून राज्य सरकारही शेतकऱ्यांना फायदा देणाऱ्या योजना चालवत आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अशीच एक योजना राबवत असून ज्यातून वर्षाकाठी ६ हजार रूपये थेट (farmer)शेतकऱ्यांच्या खात्यावर दिले जातात. प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजनेतून शेतकऱ्यांना हा लाभ दिला जातो. आतापर्यंत १८ हप्ते देण्यात आले असून १९ वा हप्त्याची वाट (pm kisan yojana )देशातील शेतकरी बघत आहेत. आता १९ व्या हप्त्याबाबत तारीख समोर आली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या खात्यावर १९ वा हप्ता जारी करणार आहेत.

पीएम किसान योजनेंतर्गत १९ व्या हप्त्याची(pm kisan yojana ) तारिख आता समोर आली असून तो कधी मिळणार असाही सवाल आता अनेकांच्या मनात आला असेल. पण चिंता करण्याची गरज नाही. अधिकृत पोर्टलवर याबद्दलची (Beed)वेळ देखील जाहीर करण्यात आली असून १९ वा हप्ता (दि.२४)फेब्रुवारी रोजी दुपारी २ते ३.३० या वेळेत जारी होण्याची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement