Advertisement

उसाच्या आडून अफूची शेती;२७ लाखांचे अफूचे पीक जप्त !

प्रजापत्र | Saturday, 15/02/2025
बातमी शेअर करा

कळंब -अमर चोंदे
 कळंब तालुक्यातील खामसवाडीत
चक्क उसाच्या फडामध्ये आंतरपीक म्हणून अफूची झाडे लावून अवैद्यरित्या व्यवसाय करत असल्याचा प्रकार शिराढोण पोलिसांनी उघड करून सदरील आरोपीस पकडून व घटनास्थळी जाऊन २७ लाख ७८ हजारांची अफूची झाडे ताब्यात घेतल्याची घटना (दि.१४) शुक्रवार रोजी घडली.
शिराढोण पोलीस ठाण्यामध्ये (दि.१५) शनिवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

 

पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील शेतकरी संभाजी उर्फ बंडू भीमराव हिलकुटे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी गट नंबर ११९ व १२१ शेतामधील उसामध्ये आंतरपीक म्हणून अफूची झाडे लावली होती कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला अथवा एनडी पीएस चे कलम ४२ मध्ये केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक माहिती न देता स्वतःच्या फायद्यासाठी अफूच्या पिकाची लागवड करून स्वतःच्या शेतामध्ये चोरटी विक्री  करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या अफूच्या झाडाची लागवड केलेली मिळून आली उपनिरीक्षक शिराढोण यांच्या फिर्यादीवरून आरोपी संभाजी हिलकुटे यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 31/2025 कलम 15 व 18 एन डी पी एस नुसार दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस अधीक्षक संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन कळंब उपविभागीय अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिराढोण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण  नेरकर हे करत आहेत या कारवाई मध्ये  कळंब पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवी सानप व त्यांचे पथक ,पोलीस उपनिरीक्षक तांबडे, अंमलदार राठोड व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement