Advertisement

अंधश्रद्धेतून उच्च शिक्षित आईवडिलांनीच केली दोन मुलींची हत्या.....!

प्रजापत्र | Monday, 25/01/2021
बातमी शेअर करा

हैद्राबाद दि.२५ - आई-वडिलांनी पोटच्या दोन मुलींची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार हैद्राबादमध्ये समोर आला आहे. आरोपी आई-वडिल उच्चशिक्षित असून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे.

              अंधश्रद्धेतून आई-वडिलांनी दोन तरुण मुलींचा जीव घेतल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामधील मदनापल्ले गावात रविवारी रात्री हे हत्याकांड घडलंय. 27 वर्षीय अलेख्या आणि 22 वर्षीय साई दिव्या अशी मयत तरुणींची नावं आहेत. शिवालयम मंदिर रोड परिसरात नायडू कुटुंब राहत होतं. मोठी मुलगी अलेख्याने भोपाळमधून मास्टर्स डिग्री मिळवली आहे. धाकटी कन्या साई दिव्या हिचं बीबीएपर्यंत शिक्षण झालं आहे.

Advertisement

Advertisement