Advertisement

भारतात घुसखोरी केली, 'लाडकी बहिण'चा लाभही घेतला

प्रजापत्र | Thursday, 23/01/2025
बातमी शेअर करा

बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करत असल्याच्या अनेक घटना उडकीस आल्या आहेत काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी एका बांगलादेशी नागरिकाला पुण्यात अटक केली होती. आरोपी गेल्या २० वर्षांपासून भारतात राहत होता. त्याने बेकायदेशीरपणे भारत-बांगलादेश सीमा ओलांडली होती आणि कोलकातामध्ये जन्म प्रमाणपत्र बनवले होते.

यानंतर तो अहमदाबाद आणि मुंबई मार्गे पुण्याला पोहोचला. मुंबई, ठाणे, पुणे आणि भिवंडी येथे बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे राहत असल्याची प्रकरणे समोर आली आहे. या आरोपींकडे भारतीय आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट अशी कागदपत्रेही सापडली.

आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका बांगलादेशी महिलेने लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. मुंबईतील कामाठीपुरातील एका महिलेने या योजनेचा लाभ घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ बांगलादेशींना अटक केली आहे. याप्रकरणी एका दलालालाही अटक केली आहे. या बांगलादेशी महिलेने भारतात घुसखोरी केली त्यानंतर बनावट कागदपत्रे बनविली आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. एजंटकडून बनावट कागदपत्रे बनवली होती. या एजंटलादेखील अटक करण्यात आली आहे. सैफवर हल्ला केलेला व्यक्तीदेखील बांग्लादेशी होता. असे म्हटले आहे.

महायुती सरकारने गेल्या वर्षी जुलैपासून लाडकी बहिण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत, लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेचा लाभ सर्वांना मिळत नसल्याने चौकशी सुरू आहे. या योजनेत साडेचार लाख अपात्र महिलांनी अर्ज केले होते. त्यांना अर्ज मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले. काही ठिकाणी या योजनेचा गैरवापर झाला आणि त्याचे फायदे मिळाले. काही ठिकाणी मुलांनी त्यांच्या बहिणींच्या नावाने फायदा घेतला होता. तक्रारी आल्यानंतर राज्यात लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांची पडताळणी केली जात आहे.

लाडकी बहिण योजनेचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावी. जर तिचे लग्न झाले आणि ती राज्याबाहेर गेली तर तिला या योजनेचा लाभ घेता येणार याशिवाय महिलेचे निवासस्थान महाराष्ट्रात असले पाहिजे, बाहेरून येणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. अशा परिस्थितीत, बांगलादेशी महिलांनी या योजनेचा फायदा कसा घेतला? असा प्रश्न उद्भवतो.

दरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले होते की, सातवा हप्ता २६ जानेवारी रोजी बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल. बहिणींना २१०० रुपये देण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात मांडला जाईल आणि मंजुरी मिळाल्यानंतर मार्चपासून त्यांच्या खात्यात पैसे पाठवले जातील. सध्या लाडक्या बहिणींना १५०० रुपयांचा हप्ता मिळत आहे.

 

Advertisement

Advertisement