केज दि.१७ (प्रतिनिधी)- (Beed Crime News) तालुक्यातील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीतील पंजाबमधील कामगाराचा (kaij)केज येथील रोडवर मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. हा मृत्यु नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही.
अधिक माहिती अशी कि, पंजाब राज्यातील हा कामगार केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करीत होता. त्याचे नाव रचपाल हमीद मसीह असून (Kaij -Ambajogai) केज-अंबाजोगाई रोडवर असलेल्या एका दारूच्या दुकानासमोर त्याचा मृतदेह रस्त्यावर पडला असल्याचे आढळून आले. केजच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेद करण्यात आले आहे. सदरील कामगाराचा मृत्यु मध्यप्राशन केल्यामुळे झाला कि अन्य काही कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपासामध्ये मृत्युचे कारण समोर येईल.या प्रकरणाचा तपास केज पोलीस करत आहेत.