अंबाजोगाई दि.१६ (प्रतिनिधी)- (Ambajogai)शहरातील अज्ञात हल्लेखोरांनी सुजित श्रीकृष्ण सोनी या तरुण व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना (दि.१५) रोजी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी कि,सुजित श्रीकृष्ण सोनी यांची नगर परिषद परिसरात कोलगेट सह अन्य कंपन्यांची एजन्सी असून ते रात्री ९ ते ९.१५ च्या दरम्यान आपले (shop)दुकान बंद करून आपल्या (crime) दुचाकीवरून घरी जात असताना शासकीय विश्रामगृहाच्या पुढे पोलीस कॉलनी नजीक फोन आल्याने ते बोलत थांबले असता मागून दुचाकीवर आलेल्या अज्ञात तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला व हाताच्या बोटावर मार लागला आहे. त्यांच्यावर हाळणीकर रुग्णालय लातूर (Ambajogai) येथे उपचार सुरू आहेत. सुजित श्रीकृष्ण सोनी हे व्यापारी असल्याने त्यांना लुटण्याचा उद्देशाने हा हल्ला केला असल्याचा प्राथमिक अंदाज असून या घटनेने (Ambajogai) अंबाजोगाई शहरातील खळबळ उडाली आहे.