Advertisement

चालू बसचे उडाले छत

प्रजापत्र | Tuesday, 14/01/2025
बातमी शेअर करा

 

नेकनुर - दि .१४ अशोक शिंदे 
विद्यार्थ्यांना शाळेत (school)सोडण्यासाठी निघालेल्या बसचा वरचा टफ चालत्या (bus)बसमध्ये निघाला, अशा खिळखिळ्या झालेल्या बस विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी एसटी महामंडळ वापरत असेल तर विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे. ही बस बीड-मुंडेवाडी येथून बाळनाथ विद्यालय चाकरवाडी , बळवंतराव कदम विद्यालय येळब घाट , (cshool)जिल्हा परिषद शाळा वाघेबाबुळगाव या ठिकाणच्या विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्यासाठी जात असताना नेकनुरजवळ रत्नागिरी फाट्या जवळ गाडीचा टप उडाला सदरील गाडीत कोणीच नसल्याने धोका टळला असला तरी अशा खराब गाड्या विद्यार्थ्यांसाठी ने-आण करण्यासाठी एस.टी महामंडळ वापरत असेल तर विद्यार्थ्यांच्या जीव धोक्यात असल्याचे मत पालक व्यक्त करत आहेत.

 

 

 परिवहन विभागाच्या काही बस भंगार अवस्थेत निघाल्या आहेत. यामुळे चालकाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. शिवाय भंगारात जाण्याऱ्या बस रस्त्यावर धावत असल्यानं प्रवाशांच्या आणि विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका असतो. आज बाळनाथ विद्यालय चाकरवाडी या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ने-आण करणारी बस भंगार अवस्थेत असणारी बस आहे. शिवाय भंगारात जाण्याऱ्या बस रस्त्यावर धावत असल्यानं प्रवाशांच्या जीवाला धोका असतो. परिवहन विभाग याला गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. भंगार, नादुरुस्त बस रस्त्यावर
एसटी महामंडळाच्या भंगार बसेसचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येत आहे. एसटी महामंडळाच्या भंगार आणि नादुरुस्त बसेसमुळे अनेक ठिकाणी अपघातांच्या घटना घडत आहेत. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी सोडली जाणारी बस भंगार अवस्थेतलीच बस आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज भंगार मधली बसच पाठवली जाते. या बस मधून विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास सुद्धा करावा लागतो. कधी खिडकी नाही तर कधी त्या बसच्या खिडकीला काचे सुद्धा नाहीत. यामुळे लहान विद्यार्थी खिडकीमधून डोकावत सुद्धा असतात. परंतु आज शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी सोडल्या जाणारे बसचे वरील छतच उडून गेले आहे. यामुळे आता विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहोचणार नाहीत. शाळेच्या होणाऱ्या नुकसानीस परिवहन मंडळ जबाबदार राहणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून शाळेसाठी कधी बस येते तर कधी नाही यासाठी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांना  शाळेचे मुख्याध्यापक जगताप सर यांनी तक्रार केली असता त्यांनी या तक्रारीला केराची टोपली दाखवल्याचे सुद्धा शाळेचे मुख्याध्यापक यांनी बोलताना म्हटले आहे. सतत शाळेसाठी भंगार बस आणि नादुरुस्त बसच पाठवली जाते. जर एखाद्या वेळेस शाळेसाठी येणारी बस ना दुरुस्त असेल भंगार असेल आणि या बसमधून विद्यार्थी जर प्रवास करत असतील तर दुर्घटना घडलीच तर परिवहन महामंडळ जबाबदार राहणार का ? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानास कोण जबाबदार राहणार ? संबंधित अधिकारी नेमक ऐकते कोणाचे ?   शाळेसाठी असल्या नादुरुस्त बस पाठवल्या तर विद्यार्थ्यांना या बस मधून जीव घेणा प्रवास करावा लागत आहे. एसटी महामंडळ अशा भंगार बसेस रस्त्यावर चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत आहे का ?, असा संतप्त सवाल आता पुन्हा एकदा विचारल्या जाऊ लागला आहे. अशा बसेसमुळे प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना  जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. भंगार बस रस्त्यावरून धावतात. त्यावर निर्बंध लावणे आवश्यक आहे.

Advertisement

Advertisement