Advertisement

देशमुख हत्या प्रकरणातील तपासाच्या एसआयटी (SIT) मध्ये बदल

प्रजापत्र | Monday, 13/01/2025
बातमी शेअर करा

बीड दि.13 (प्रतिनिधी): संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या (Murder) प्रकरणात तपास करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये (SIT) आता बदल करण्यात आला आहे. एसआयटीमधील काही अधिकार्‍यांवर आक्षेप घेतले गेल्यानंतर राज्याच्या गृह विभागाने एसआयटी बदलली आहे. आता सीआयडीच्या अप्पर पोलीस अधिक्षक किरण पाटील (Kiran Patil) या एसआयटीचे प्रमुख असणार आहेत.

नव्याने गठीत करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये अप्पर पोलीस अधिक्षक किरण पाटील यांच्यासोबत सीआयडीचे पोलीस उपअधिक्षक अनिल गुजर, सीआयडीचे पोलीस निरीक्षक सुभाष मुठे, सीआयडीच्या भराभरी पथकाचे पोलीस निरीक्षक अक्षयकुमार ठिकणे, सीआयडीच्या भरारी पथकातील हवालदार शर्मिला साळुंके आणि दिपाली पवार यांचा समावेश असणार आहे.

Advertisement

Advertisement