परळी दि.११ (प्रतिनिधी)- धर्मापुरी येथुन परळीकडे आणण्यात येत असलेला ४ लाख ७८ हजार ५०० रुपयांचा गुटखा परळी ग्रामीण पोलिसांनी शुक्रवार (दि.१०) रोजी रात्री पकडला.याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात बंदी घातलेल्या गुटख्याची परळी शहरात सर्रासपणे विक्री होत असते.परळी हे गुटखा विक्रीचे केंद्र बनले होते.जिल्हा पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी पदभार घेताच बीड जिल्ह्यात गुटखाबंदी केल्यानंतरही परळी शहरात गुटख्याची आवक सुरुच आहे.धर्मापुरी येथुन परळीकडे गुटखा येत असल्याची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक चोरमले यांच्या पथकाने परळी-धर्मापुरी मार्गावरील सिमेंट फॅक्ट्रीजवळ नवनाथ हरगावकर,आर.पी.केकान,जी.ए.येलमटे,जी.व्ही.भताने,आर.टी.मुंडे, यांच्या पथकाने वाहनांची तपासणी केली असता (दि.१०) रोजी रात्री ८.५० वाजता हुंदाई कार क्र.एम.एच.३८ झेड २१२१ या कारमधून धर्मापुरीहुन परळीकडे आणण्यात येत असलेला २ लाख १० हजार ६०० रुपयांचा विमल पानमसाला,५२ हजार ५०० रुपयांचा नवरत्न पान मसाला,५३ हजार ८२० व्ही १ टोबॅको,६ हजार ६०० रुपयांचा व्ही १ टोबॅको,५५ हजार रुपयांचा पान मसाला असा एकुण ३ लाख ७८ हजार ५०० रुपयांचा गुटखा जप्त केला.याप्रकरणी रहेमतअली कटुमियॉं सय्यद,मतीन समदानी शेख दोघेही रा.मलिकपुरा, परळी,अजिजलाला कुरेशी,हकीम कुरेशी आझादनगर,अनंत मुंजाजी फले कृष्णानगर या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.