Advertisement

होळ-आडस रस्त्यावर तीन महिन्याचे अर्भक आढळले

प्रजापत्र | Monday, 23/12/2024
बातमी शेअर करा

 केज दि.२३ (प्रतिनिधी)- तालुक्यातील होळ ते आडस दरम्यान जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका उसाच्या शेतात तीन महिन्याचे पुरुष जातीचे जिवंत अर्भक आढळून आले आहे.आज (दि.२३) सोमवार रोजी सकाळी सातच्या सुमारास शेतात जाणाऱ्या एका शेतकऱ्याला उसाच्या शेतात काळ्या व लाल चौकटी रंगाच्या कपड्यात पांघरून घातलेले एक ती नमहिन्याचे पुरुष जातीचे जिवंत अर्भक आढळून आले. शेतकऱ्याने ही माहिती युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांना दिली. 

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी पोलीस उपनिरीक्षक राहुल पतंगे आणि  श्री.खेडकर व महिला पोलिस गाडेकर यांना घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी सदर अर्भक ताब्यात घेवून त्याला स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

Advertisement

Advertisement