बीड दि.२२(प्रतिनिधी)- भरधाव वेगाने जाणाऱ्या (st bus)एसटी बसने दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराला दुचाकीसह बसने जवळपास २०० फूट अंतरापर्यंत फरफटत नेले होते. (beed)यात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा जागीच मृत्यु झाला आहे. अपघात झाल्यानंतर महामार्गावर नागरिकांची गर्दी जमली होती.
गेवराई- शेवगाव राज्य महामार्गावरील महार टाकळी येथे सदरची दुर्दैवी घटना आज (दि.२२) रोजी घडली. या अपघातात महारटाकळी (ता. गेवराई) येथील फय्याज खान (वय ४५) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. फैय्याज खान हे अर्ध पिंपरी याठिकाणी जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत होते. ते आपल्या गावालगत असलेल्या क्रिकेट मैदानावर रोज सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी जात होते. दरम्यान नेहमीप्रमाणे आज देखील सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. क्रिकेट खेळून झाल्यानंतर ते घराकडे निघाले होते. याच वेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या माजलगाव- पुणे या राज्य परिवहन महामंडळाच्या बसने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात शिक्षक फय्याज खान जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच चकलांबा पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचा पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला.