Advertisement

बीडला धक्के सुरूच,आणखी चारने वाढली कोरोनाग्रस्तांची संख्या

प्रजापत्र | Monday, 22/06/2020
बातमी शेअर करा

बीड-शहरात कोरोनाचे मीटर थांबण्याचे नाव घेत नसून सोमवारी (दि.२२) आणखी चार नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे.सोमवारी ६७ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.यातील ६३ नमुने निगेटिव्ह आले असून ४ पॉझिटिव्ह आले आहेत. सर्व कोरोनाग्रस्त रुग्ण हे छोटी राज गल्ली येथील रहिवाशी आहेत. यामध्ये ३० वर्षीय स्त्री,३८,२७ वर्षीय पुरुष व १० वर्षीय मुलाचा समावेश असून आता बीड जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३२ च्या घरात गेली आहे. 

Advertisement

Advertisement