अंबाजोगाई दि.१०(प्रतिनिधी )-(accident)अंबाजोगाई- लातूर महामार्गावरील (Ambajogai)अंबासाखर कारखान्याजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात आज (दि.१०) रोजी सकाळी सातच्या सुमारास झाला असून चौघांचा जागेवरच मृत्यु झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सविस्तर माहिती अशी कि,मित्राची पार्टी करून मांजरसुबा येथून स्विफ्ट कार क्रमांक एम.एच १४. एल एल ६७४९ कारने गावी जात असताना अंबाजोगाई तालुक्यातील अंबासाखर कारखाना जवळ समोरून येणाऱ्या ट्रकला जोराची धडक दिली यात कारचा चुराडा झाला ,कारमधील चौघांचा मृत्यु झाला तर दोघे जखमी झाले आहेत. स्वीफ्ट कार मधील सर्व कारेपूर जिल्हा लातूर येथील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामा पडवळ यांनी कर्मचारी यांना घेऊन घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. १) फारुख शेख (वय २८), २) दीपक सावरे(वय ३२), ३) बालाजी माने(वय ३०),४) ऋषिकेश हनुमंत गायकवाड (वय ३०) हे सर्वजन कारेपूर (ता. रेणापूर, जिल्हा लातूर) अशी मयतांची नावे आहेत.