बीड : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे परळी मतदारसंघातील पदाधिकारी तथा कार्यकर्ते माधव जाधव यांना काल परळीत मारहाण झाली होती. याच्या निषेधार्थ आज (दि.२१) रोजी अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर गावात बंद पूकारण्यात आला आहे. यामुळे गावातील व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवले असून पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election) काल मतदान प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेदरम्यान वादावादी, मारहाण झाल्याच्या घटना घडल्या. अशीच एक घटना (Beed News) बीड जिल्ह्यात घडली असून परळीत शरद पवार गटाच्या माधव जाधव यांना मारहाण झाली. तर मारहाणीनंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून ईव्हीएम मशीनसह मतदान केंद्रातील सामान अन् काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. दरम्यान मारहाणीच्या निषेधार्थ आज घटनांदूर गावात बंद पाळण्यात आला आहे.