Advertisement

 विश्वास ठेवा, कोणाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही : अजित पवार

प्रजापत्र | Wednesday, 13/11/2024
बातमी शेअर करा

 बीड: आम्ही शिवरायांचा विचार घेऊन चालणारे आहोत, इथे बटेंगे कटेंगे असले चालणार नाही.  आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहोत. तुम्ही महायुतीवर विश्वास ठेवा, योगेश क्षीरसागरांना निवडून द्या, कोणाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असे  प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बीड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. 
कृषीमंत्री धनंजय मुंडे, उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, कल्याण आखाडे, पप्पू कागदे, राजेश्वर चव्हाण, सर्जेराव तांदळे,डॉ. सारिका क्षीरसागर यांची यावेळी उपस्थिती होती.
अजित पवार यांनी महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येणार असल्याचे सांगितले. आम्ही फुले, शाहु, आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे जात आहोत, त्यात अंतर पडणार नाही. मधल्या काळात आपण सरकारमध्ये जावे अशी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची इच्छा होती. कारण त्याशिवाय विकास कसा करणार? आपल्या भागाचे प्रश्न सोडविण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला असे पवार म्हणाले. आचारसंहिता संपताच बीडचा पाणीप्रश्न सोडविणार असल्याचे, तसेच बिंदुसरा पुल, बंधारा प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द देखील पवारांनी दिला. अधिवेशनाचा उपयोग तोडपाणीसाठी करुन त्या भागाचा विकास होत नसतो असा टोलाही अजित पवारांनी लगावला. आम्ही शिवरायांचा विचार घेऊन चालणारे आहोत, इथे बटेंगे कटेंगे असले चालणार नाही.  आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहोत. तुम्ही महायुतीवर विश्वास ठेवा, योगेश क्षीरसागरांना निवडून द्या, कोणाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असे  प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
मंत्री धनंजय मुंडे यांनी विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर टीका केली.  मागच्या पाच वर्षात इथल्या विद्यमान आमदारामुळे जनतेला जो त्रास झाला त्याबद्दल मी जनतेची माफी मागतो असे सांगत,  ही निवडणूक अहंकार विरुध्द संयमाची आहे. पहिले अडीच वर्ष तर मलाच बीडला यायची बंदी होती. असला अहंकारी लोकप्रतिनिधी कधी पाहिला नाही. त्यामुळे आता संयमी उमेदवार दिला असल्याचे सांगितले. जयदत्त क्षीरसागर यांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांना आशीर्वाद दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानत असल्याचे मुंडे म्हणाले.
पप्पू कागदे यांनी शोषितांचे प्रश्न सोडविण्यासाठी डॉ. योगेश क्षीरसागर यांना निवडून देण्याचे आवाहन केले. 
प्रास्ताविकात डॉ. योगेश क्षीरसागर यांनी प्रत्येक समाजाला न्याय देण्याची काकूंची परंपरा आपण पुढे नेत आहोत. मागच्या पाच वर्षात येथील आमदारांनी विकासाची वाट लावली. लोकांच्या जमिनी बळकावल्या. लोकांचे फेरफार अडविले. आता आपल्याला बीडचा कोरोना घालवायचा आहे असे सांगितले. 

यावेळी माजी आ. जनार्दन तुपे, सय्यद नविदुज्जमा,गंगाधर घुमरे, बबनराव गवते, अमर नाईकवाडे,मोईन मास्टर, फारुक पटेल, सुभाष क्षीरसागर, बप्पासाहेब घुगे,  मुन्ना फड, अशोक हिंगे, सयाजी शिंदे, उमेश आंधळे यांची उपस्थिती होती.

Advertisement

Advertisement