बीड दि.९ (प्रतिनिधी)-सिमेंट घेवून निघालेल्या टॅम्पोखाली (beed police)पोलिस कर्मचारी आल्याने सदरील कर्मचारी जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना आज (दि.९) सकाळी शहरातील पांगरी रोडवर असलेल्या अंबिका चौक भागात घडली.
सविस्तर माहिती अशी कि, (beed police) शिवाजी नगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सुनिल घोळवे (वय ५४ वर्षे) हे आज सकाळी स्कुटी क्रं. एम.एच ४४ .ए.ए.९०७६ यावर पांगरी रोडवरून अंबिका चौक या कडे येत होते. (accident) चौकातून पांगरी रोडकडे सिमेंट घेवून निघालेल्या टॅम्पोच्या खाली सुनिल घोळवे यांची स्कुटी आल्याने यामध्ये घोळवे हे टायरखाली आल्याने यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. या दुर्देवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
बातमी शेअर करा