बीड-पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ७० वर्षीय आजीवर नातवाने बलात्कार केल्याची घटना आज सकाळी समोर आली.पीडितेने सकाळीच पिंपळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला.मात्र रात्री ७ वाजेपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचीच प्रक्रिया सुरु होती.एकीकडे पोलीस अधिक्षक खाकीचा धाक निर्माण करत असताना दुसरीकडे वर्दीतील अधिकारीच आपल्या संवेदना बोथट करणार असतील नागरिकांनी न्यायासाठी दादा मागायची कोणाकडे ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एका गावात ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचाराची घटना घडली.यात नातवानेच आजीवर जबरदस्ती करत अत्याचार केला.सकाळी ७-८ च्या दरम्यान पीडिता गुन्हा दाखल करण्यासाठी पिंपळनेर पोलीस ठाण्यात ठाण मांडून आहे.मात्र अजूनही पोलीस याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच असल्याचे सांगत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.एखाद्या संवेदनशील प्रकरणात पोलीसच बघ्याची भूमिका घेणार असतील तर न्यायासाठी दाद मागायची कोणाकडे ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
आरोपीवर दाखल करू गुन्हा
पीडिता आज सकाळीच ठाण्यात आली आहे.मात्र काही कारणास्तव आमच्याकडून गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब झाला.मात्र थोड्यावेळातच या प्रकरणात आम्ही गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेणार असल्याची माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी मधुसूधन घुगे यांनी दिली.