बीड-महायुतीकडून बीड जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघातील उमेदवार निश्चित झाल्यानंतर आता बीड विधानसभा मतदार संघातून डॉ. योगेश क्षीरसागर यांना उमेदवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मिळाली आहे. त्यामुळे शिंदे सेनेला सुटणारी बीडची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली आहे. आज योगेश क्षीरसागर उमेदवारी अर्ज दाखल करणार असून या निवडणूकीत तीन क्षीरसागर आमने-सामने येणार असल्याचे चित्र आहे.
बीड विधानसभा मतदार संघात उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच सुरु होती. शरद पवारांनी तुतारीकडून आ. संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर महायुतीत ही जागा कोणाला सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ही जागा सुटली असून योगेश क्षीरसागर आपला उमेदवारी अर्ज थोडयावेळात दाखल करणार आहेत. त्यामुळे आता प्रथमच बीड जिल्ह्याच्या राजकारणात तीन क्षीरसागर आमने-सामने येणार असल्याची परिस्थिती आहे.