बीड दि.२८ (प्रतिनिधी)- बीड विधानसभा मतदारसंघासाठी महायूतीतील जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. बातम्या येत आहेत, जागा याला सुटली, त्याला सुटली मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. आजचा मुहूर्त चांगला असल्याने मी बीड शहरात आलो आहे आणि आता आम्ही पती-पत्नी आपआपले अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत. मी एवढेच सांगतो मी दाखल केलेला उमेदवारी अर्ज हा परत घेण्यासाठी नसेल, असे स्पष्ट प्रतिपादन योगेश क्षीरसागर यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांशी बोलताना केले.
बातमी शेअर करा