Advertisement

बीडमध्ये शरद पवार गटाची उमेदवारी संदीप क्षीरसागरांनाच

प्रजापत्र | Saturday, 26/10/2024
बातमी शेअर करा

बीड : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा (beed)बीडचा उमेदवार अखेर ठरला असून पक्षाने बीडमधून पुन्हा विद्यमान आमदार संदीप क्षीरसागरांनाच संधी दिली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये बीडच्या उमेदवारीवरुन मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरु होती. या पार्श्वभूमीवर आज उमेदवारांची दुसरी यादी पक्षाने जाहीर केली आहे. यात बीडमधून पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले विद्यमान आमदार संदीप क्षीरसागरांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. (ncp)राष्ट्रवादी मधील फुटीच्या वेळी बीड जिल्ह्यातील (Sandeep Kshirsagar) संदीप क्षीरसागर हे एकमेव आमदार शरद पवारांसोबत ठामपणे राहिले होते. त्यांच्या या निष्ठेचे फळ म्हणून त्यांना ही उमेदवारी जाहीर झाली आहे.

Advertisement

Advertisement