Advertisement

डेमोक्रॅटिक पार्टीची राज्यातील ७ राखीव जागेवर दावेदारी

प्रजापत्र | Monday, 21/10/2024
बातमी शेअर करा

बीड दि.२१ (प्रतिनिधी)- राज्यात महाविकास आघाडीसोबत असणाऱ्या डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने आता बीडच्या केजसह महाराष्ट्रातील ७ राखीव विधानसभा मतदारसंघावर दावेदारी केली आहे. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे नेते अजिंक्य चांदणे यांनी शरद पवारांची भेट घेतली असून या जागा आम्हाला सोडाव्यात, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता SC साठी राखीव असणाऱ्या केज विधानसभा मतदारसंघासह राज्यातील मोहोळ, मिरज, फलटण, बदनापूर, वाशिम - मंगरूळपीर, उदगीर या ७ विधानसभा मतदार संघातील उमेदवारीवरून रस्सीखेच होताना पाहायला मिळत आहे.. दरम्यान यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून पेच वाढणार आहे.

Advertisement

Advertisement