Advertisement

राजेंद्र मस्केंनी सोडले जिल्हाध्यक्षपद

प्रजापत्र | Sunday, 20/10/2024
बातमी शेअर करा

बीड दि.२० (प्रतिनिधी)- भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के (Rajendra maske) यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.ते (bjp)भाजपला ही रामराम ठोकणार असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत.रविवारी (दि.२०) मस्के यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळाला अनेक चर्चांना पेव फुटले. 
  राजेंद्र मस्के यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाचे काम केले नसल्याचा आरोप त्यांच्यावर होत होता.अनेकांनी त्यांचे पद काढून घेण्याची मागणी देखील केली होती.मात्र (
Pankaja Munde) पंकजा मुंडे त्यांच्या पाठीमागे असल्याने ते पदावर कायम राहिले.आता रविवारी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.ते (sharad pawar)शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा असून भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष कोण ? हे पाहणे महत्वाचे ठरणार. 

Advertisement

Advertisement