Advertisement

वंचितचे गेवराई आणि आष्टीतील उमेदवार जाहीर

प्रजापत्र | Saturday, 19/10/2024
बातमी शेअर करा

बीड दि.१९ (प्रतिनिधी)-विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने शनिवारी राज्यातील १६ जणांच्या उमेदवाऱ्या जाहीर केल्या आहेत.यात गेवराईतून प्रियांका शिवप्रसाद खेडकर तर आष्टीतून वेदांत सुभाष भादवे उमेदवार असणार आहेत.प्रकाश आंबेडकर यांनी या उमेदवाऱ्या जाहीर केल्या. 
         बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून वंचितने राज्यभरात आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.शनिवारी १६ जणांच्या उमेदवाऱ्या जाहीर करण्यात आल्या असून यात चकलांबा गावच्या सरपंच असलेल्या प्रियांका शिवप्रसाद खेडकर यांना गेवराई विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.प्रियांका खेडकर यांचे गेवराई मतदारसंघात चांगले काम असून त्या सरपंच आहेत.तर आष्टीत आंबेडकर यांनी वेदांत सुभाष भादवेला आपल्या पक्षाची उमेदवारी जाहीर केली आहे.याशिवाय इतर १४ जणांच्या देखील उमेदवारी जाहीर करण्यात आल्या होत्या.

Advertisement

Advertisement