Advertisement

३०७ च्या आरोपीला भेटण्यासाठी पोलिसांनीच घातला धिंगाणा

प्रजापत्र | Friday, 18/10/2024
बातमी शेअर करा

बीड दि.१८ (प्रतिनिधी)- येथील शहर (beed police)पोलीस ठाण्यात ३०७ प्रकरणातील आरोपीला भेटण्यासाठी थेट चार पोलिसांनीच मद्यप्राशन करून धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस अधिक्षक (beed sp) अविनाश बारगळ एकीकडे खाकीचा धाक निर्माण करत असताना त्यांचेच कर्मचारी दारू पिऊन आरोपीला भेटण्यासाठी धूडगुस घालत असल्यामुळे खळबळ उडाली आहे. विपुल गायकवाड (vipul gaikwad)असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर ३०७, ३२७/२३ भादवि नुसार गुन्हा दाखल आहे. विपुल मागच्या अनेक दिवसांपासून फरार होता. त्याला अटक केल्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे तो(beed city police) शहर पोलीस ठाण्यातील जेलमध्ये होता.यावेळी विपुलला भेटण्यासाठी रात्रीच्या सुमारास १० ते १२ जण दारूच्या नशेत आले होते. यावेळी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले ठाणे अंमलदार रेडेकर यांनी या सर्वांना भेटीपासून रोखण्याचा प्रयत्न केला.(crime news)मात्र दारूच्या नशेत असलेल्या लोकांनी रेडेकर यांच्याशी हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा आणला.विशेष म्हणजे कायद्याची पायमल्ली करण्यात चार पोलीस कर्मचाऱ्यांचा वाटा होता. यात मुख्यालयातील विनायक जोगदंड, आरसीपीमधील श्री. खेडकर, गेवराईचे पोलीस कर्मचारी गणेश कुटे आणि शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी संदीप कांबळे यांनी धिंगाणा घातल्यामुळे त्यांच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

ते कर्मचारी निलंबित?

एकाकीडे पोलीस अधिक्षक कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असताना दुसरीकडे वर्दीतील लोकच धूडगुस घालणार असतील? तर कुंपणच शेत खातंय अश्या चर्चा सुरु झाल्या आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे सांगितले जाते.मात्र पोलीस अधीक्षकांशी याबाबतीत संवाद होऊ शकला नाही.

 

Advertisement

Advertisement