Advertisement

किसान सभेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्देशने

प्रजापत्र | Wednesday, 16/10/2024
बातमी शेअर करा

बीड दि.१६ (प्रतिनिधी)- शेतकर्‍यांचे थकीत राहिलेले अनुदान तात्काळ देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आज (दि.१६) रोजी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निर्देशने करण्यात आली.  

 

कापसाला १० हजार तर सोयाबीनला ७ हजार रूपये भाव देण्यात यावा, सन २०२३ खरीप व रब्बी या दोन्ही हंगाामातील वंचित शेतकर्‍यांचा पिक विमा मिळवण्यासाठी तसेच या यादया गावनिहाय शेतकर्‍यांच्या नाव रक्कमेसह प्रकाशित करून पिक विम्यात पारदर्शकता आणण्यात यावी, महाडीबीटी अंतर्गत विशेष करून ठिबक व इतर योजनांचे बीड जिल्ह्यातील सर्व शेतकर्‍यांचे थकीत अनुदान तात्काळ देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आज अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करण्यात आली आहेत.आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
 

Advertisement

Advertisement