माजलगाव दि. १५ (प्रतिनिधी ) : वडवणी तालुक्याच्या राजकारणात अग्रेसर नाव म्हणून बाबरी मुंडे यांच्याकडे पहिले जाते . हा तरुण चेहरा आगामी विधानसभेच्या अनुषंगाने माजलगाव तालुक्यातही सक्रिय झाला आहे.दरम्यान दोनच आठवड्यात त्यांनी आपली क्रेज याठिकाणी निर्माण केली आहे. तालुक्यात तब्बल ५० गाववस्तीवर त्यांनी आपला संवाद दौरा पूर्ण केला आहे.या झंजावती दौऱ्यात हजारो तरुणांची साथ भेटत असून
गावागावात वस्तीवस्तीवर त्यांना थोडामोठ्यांचा आशीर्वाद,उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
गोपीनाथराव मुंडे,आ.पंकजा मुंडे यांचे निकटवर्ती म्हणून राजाभाऊ मुंडे व त्यांचे पुत्र बाबरी मुंडे यांचे नाव आहे.वडवणी तालुक्यातील राजकारणात समाजकारणात त्यांचा प्रभाव आहे.जिल्हाभर त्यांची ओळख आहे.'युथ आयकॉन'म्हणून बाबरी मुंडेनी आपली ओळख तरुणांच्या मनात निर्माण केली आहे.दरम्यान जिल्ह्यात मराठा ओबीसी असा राजकीय वाद टोकावर पोहोचला आहे.अशा स्थितीत माजलगाव विधानसभेत प्रभावी ओबीसी चेहरा असणाऱ्या नेतृत्वाला नशीब आजमावण्याची संधी आहे.याच पार्श्वभूमीवर ओबीसीचा प्रभावी चेहरा म्हणून बाबरी मुंडे यांनी माजलगाव विधानसभेत आपले नशीब आजमावण्यास सुरुवात केली आहे.बोलका,हसता खेळता मनमोकळा स्वभाव,येथील तरुणांना फक्त दोनच आठवड्यात लक्षात आला.त्यामुळे शितावरून भाताची परीक्षा झाली असल्याने बाबरी मुंडे यांनी येथे आपली क्रेझ निर्माण केली आहे.हजारो तरुण त्यांना येऊन भेटत आहेत. माजलगाव तालुक्यातील बडेवाडी, नित्रुड, सुलतानपूर,नाकलगाव, पिंपळगाव,दिंद्रूड,रामनगर तांडा, मोठेवाडी, हनुमान नगर,पवारवाडी, कल्याण नगर,सिद्धेश्वर नगर,खरात आडगाव,हनुमान नगर तांडा, निपाणीटाकळी,वसंत नगर तांडा,शुक्लतीर्थलिंमगाव,सोन्नाथडी,गुंजथडी,सुरूमगांव,गंगामसला, आडोळा,सरवर पिंपळगांव, आबेगाव,छत्र बोरगाव,सिमरी पारगाव,जीवनापूर नाथनगर तांडा,साळेगाव,देवळा,कोथरूळ, पुरुषोत्तमपुरी,माळेवाडी,महातपुरी, वाघोरा,किट्टीआडगाव,गोविंदवाडी, लऊळ नं.1,पात्रूड,शिंदेवाडी, लहामेवाडी,गुजरवाडी,शेंडगेवस्ती ई.५० गाव वस्ती,वाडी,तांड्यावर आपला संवाद झंजावती दौरा त्यांनी पोहोचवला आहे.या झंजावाती संवाद दौऱ्याला,या तरुण नेतृत्वाला तरुणांची प्रचंड साथ भेटत आहे