बीड दि. १५ (प्रतिनिधी ) बिंदुसरा नदीपात्राच्या तिरावर साधारणतः ५०० वर्षांर्षीचे दगडी आकर्षक हेमाडपंती बांधकाम असलेले कालिंदेश्वर महादेवाचे मंदिर नामशेष करुन हडप करण्याचा बिल्डरांचा डाव अखेर सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे उधळला आहे. तत्कालिन उपजिल्हाधिकारी (भूसाधार) प्रकाश आघाव यांनी दिलेले देवस्थानची वर्ग दोनची इनाम जमीन वर्ग एक करण्याचे आदेश बेकायदा ठरवत उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शैलेश सुर्यवंशी यांनी ते आदेश रद्द केले. याबाबत 'प्रसिद्धी माध्यमानी सातत्याने या प्रकरणाला वाचा फोडण्याचे काम केले सामाजिक कार्यकर्त्यांनी ही हे प्रकरण लाऊन धरले
बीड या पैकीच शहरातील श्रीकृष्ण मंदीराच्यामागे बिंदुसरा नदीपात्राच्या पश्चिमेला फुलाई नगर भागात संपूर्ण दगडी बांधकाम असलेले पुरातन हेमाडपंती कालिंदेश्वर मंदिर आहे. हे स्थान पुर रेषेच्या हद्दीतील इनाम जमिनीमध्ये साधारण ५०० वर्षांपूर्वीचे हे ऐतिहासिक मंदिर स्थित असून त्याच बाजूला एक ऐतिहासिक बारव देखील आहे. त्याच बारवा शेजारी एक दर्गा आहे जो हिंदू मुस्लिम धर्माचे ऐक्याचे प्रतीक मानले जाते. मात्र, सदर ४६ गुंठे जमिन बिल्डरांनी बेकायदेशीर खरेदी केली. या ठिकाणी अपार्टमेंट बांधकाम करतानाच नदीपात्राला संरक्षण भीत उभारुन हे मंदीरालाही पाश लावला.
याबाबत प्रसिद्धी माध्यमानी सातत्याने हा विषय लावून धरल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड व डॉ. गणेश ढवळे यांनी हिंदू धर्माचे हे प्रतीक वाचवण्यासाठी आंदोलन उभारले. त्यामुळे मंदिर नामशेष करण्याचा कट फसला. तत्कालिन उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांनी सदर इनाम जमिन वर्ग दोनची वर्ग एक करण्याची परवानगी दिलेले आदेश उपजिल्हाधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी रद्द केले आहेत. याबाबत त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या शासकीय अभियोक्तांनाही कळविले आहे.
तत्कालिन उपजिल्हाधिकाऱ्यांचा 'आघाव 'पणा
तत्कालिन उपजिल्हाधिकारी (भूसाधार) प्रकाश आघाव पाटील यांनी देवस्थान जमिनींचे अनेक बेकदायदा हस्तांतरणाचे आदेश दिलेले आहेत. त्यांच्यावर बीडला तीन गुन्हेही नोंद झालेले आहेत. आता त्यांच्याच काळातील हा 'आघाव'पणा समोर आला. याही प्रकरणात ४६ गुंठे जमिन भोगवटादार वर्ग दोन मधून भोगवटादार वर्ग एक करण्याची त्यांनी दिलेली परवानगी अनेक नियमांना बगल देत दिलेली असल्याचे समोर आले. त्यामुळे उपजिल्हाधिकारी (सामान्य ) शैलेश सूर्यवंशी यांनी हे आदेश रद्द केले. यामुळे देवही बिल्डरांच्या पाशातून सुटल्याची प्रतिक्रिया आंदोलक डॉ. गणेश ढवळे व रामनाथ खोड यांनी व्यक्त