बीड दि.१४ (प्रतिनिधी)- बीड येथील रेल्वेस्थानकाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुरथ वीर यांचे उपोषण सुरू आहे. त्यातच आज (दि.१४) सोमवार रोजी आंबेडकरी जनतेने रस्त्यावर उतरून ही मागणी लावून धरली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून समस्त भीमशक्तीने रेल्वेस्थानकाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिलेच पाहिजे अशी आग्रही मागणी केली. हातात निळे झेंडे घेवून सहभागी झालेल्या आंदोलकांनी भर उन्हात मोर्चा काढला. आपल्या मागणीचे निवेदन त्यांनी प्रशासनाला दिले आहे. या संदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. या मोर्चात महिला, पुरूष युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
बातमी शेअर करा