Advertisement

केज तालुका ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा वरचष्मा.…...!

प्रजापत्र | Monday, 18/01/2021
बातमी शेअर करा

केज तालुका ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा वरचष्मा

बीड दि. १८ - केज तालुक्यातील २३ ग्रामपंचायतिसाठी निवडणूक जाहीर झाली होती. सकाळी 10 वाजता 10 टेबलवर मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण सहा फेऱ्या झाल्या त्यामध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व निकाल हाती आले.
            त्यामध्ये घाटेवाडी, मोटेगाव, आंधळेवाडी आणि शिंदी या ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या होत्या. तर उर्वरित 19 ग्रामपंचायती साठी झालेल्या निवडणुकीत येवता, पाथरा, काशिदवाडी, मुंडेवाडी, वाघे बाभूळगाव, सुकळी, भोपला, रामेश्वरवाडी / ढाकणवाडी बानेगाव, कोरडेवाडी, लाखा या 14 तर घाटेवाडी आणि मोटेगाव या दोन बिनविरोध आलेल्या ग्रामपंचायती राष्ट्रवादी च्या ताब्यात आल्या आहेत. तर विडा, जाधवजवळा, धोत्रा, शिंदी, बोबडेवाडी भाजपच्या ताब्यात तर पैठण मध्ये तिसरी आघाडी निवडून आली आहे. गप्पेवाडी/ नामेवाडी, दरडवाडी ग्रामपंचाती वर अद्याप कुणी दावा केलेला नाही. तर मनसेने नारेवाडी ग्रामपंचायती वर दावा केला आहे.
                 दरम्यान पार पडलेल्या ग्रामपंचायती मध्ये एकूण 158 सदस्य निवडून आले असून यामध्ये 80 महिला निवडून आल्या आहेत. तर नोटाला 494 मतदारांनी पसंती दिली आहे. एकूण 615 उमेदवार रिंगणात होते.

Advertisement

Advertisement