Advertisement

 मुंबई दि.४ (प्रतिनिधी ) ऑगस्ट महिन्यात (Beed)बीड जिल्ह्यातील विविध महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून सुमारे ४०,१६९ हेक्टर वरील क्षेत्रासाठी ७९,१९२ शेतकऱ्यांना(Farmer) ५४ कोटी ६२ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर झाली आहे.  महसूल व वन विभागाच्या मार्फत याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. चार दिवसापूर्वी निघालेल्या शासन निर्णयात बीड जिल्हा ऑगस्टच्या मदतीपासून वगळला गेला होता, त्यामुळे (dhananjay munde) पालकमंत्री धंनजय मुंडे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून  जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना येऊ महिन्याच्या आत मदत मिळवून देण्याचा दिलेला शब्द पूर्ण केला आहे.
ऑगस्ट महिन्यात दुसऱ्या तिसऱ्या व शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी होऊन शेतीपिके बाधित झाली होती. त्या बाधित शेतकऱ्यांना आता मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाने चार दिवसापूर्वी जुलै,ऑगस्ट मधील अतिवृष्टीबाधितांना मदत जाहीर केली होती. त्यात(beed) बीड जिल्ह्यात ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचा समावेश नव्हता. यासंदर्भात 'प्रजापत्र ' ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही अतिवृष्टीबाधितांना मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आता ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा निधी सुमारे ८ व हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे.

 

सप्टेंबरमधील अतिवृष्टीबाधितांसाठी ५२० कोटींचा प्रस्ताव
दरम्यान बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी व सततच्या पावसाने सर्वाधिक नुकसान हे सप्टेंबर महिन्यात झाले होते, त्या बाबतचेही नुकसान भरपाईचे ५२० कोटी रुपये मदतीचे अहवाल शासनास जिल्हा प्रशासनाच्या वतीने ०३ ऑक्टोबर रोजी पाठवण्यात आलेले असून तीही मदत शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे.

 

 

Advertisement

Advertisement