शिरूर (का) दि.३ प्रतिनिधी)- तालुक्यातील तहसील कार्यालय आतापर्यंत प्रभारी तहसीलदार यांच्यावर सर्व कारभार चालत होता बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या शिरूर तालुक्याला हक्काचे तहसीलदार मिळाले सुरेश घोळवे यांची शिरूर कासारचे तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तहसील कार्यालयात सर्वसामान्यांचे अनेक कामे असतात परंतु प्रभारी अधिकारी असल्यामुळे सर्वसामान्यांच्या कामांना उशीर लागत असे ग्रामीण भागातील नागरिकांच्या कामांचा खोळंबा होत असे मात्र आता लोकांची हेळसांड थांबणार आहे. कारण शिरूरला हक्काचे तहसीलदार मिळाले आहेत.सुरेश घोळवे तहसीलदार भोकर,जी. नांदेड येथून शिरूर कासारच्या रिक्त असलेल्या जागेवर त्यांची नियुक्ती झाली आहे .
बातमी शेअर करा