Advertisement

धारुर तालुक्यातील चार ग्रामपंचायतींचे निकाल जाहिर...

प्रजापत्र | Monday, 18/01/2021
बातमी शेअर करा
 
 
किल्लेधारूर-तालुक्यातील जहागिरमोहा, रुई धारूर, भोपा व कासारी या ठिकाणच्या ग्रामपंचायतींचे निकाल आज येथील तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आले. विजयी उमेदवार पुढील प्रमाणे आहेत.
 
जहागिरमोहा  ग्रामपंचायत (Grampanchayat election) -
प्रभाग क्रमांक १ (अनुसूचित जमाती) 
कोंबडे बंडू बाबुराव (३५०) मते घेऊन विजय मिळवला तर कांदे आशाबाई संजय (३५२) मते घेऊन विजयी झाल्या आहेत. सर्वसाधारण स्‍त्री राखीव मधून शिंदे  रूक्‍मीनबाई अभिमान (३०३) घेऊन विजयी झाल्या आहेत.
दुसऱ्या फेरीत सर्वसाधारण प्रवर्गातून रब्बानी अब्दुल रहमान (३२२) मते घेऊन विजयी झाले आहेत तसेच अनुसूचित जमाती स्‍त्री राखीव प्रवर्गातून बिल्पे शिवकन्या वसुदेव (४०२) मते घेऊन विजयी झाले आहेत. तिसऱ्या फेरीत सर्वसाधारण स्‍त्री राखीव प्रवर्गातून राठोड तुळसाबाई बाजीराव (३२६) मते घेऊन विजयी
 
भोपा ग्रामपंचायत- 
चाटे रविराज प्रभाकर (१७८) मते घेवून विजयी झाले आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातून वाघचौरे प्रवीण इंद्रजित (१७८) मते घेवून विजयी झाले. सर्वसाधारण स्त्री राखीव प्रभागातून वाघचौरे मीराबाई अशोक (१८६) मते घेवून विजयी झाले आहेत. दुसऱ्या फेरीत अनुसूचित जमाती प्रवर्गातून गायकवाड गोविंद प्रकाश (२१६) घेऊन विजयी झाले आहेत. स्‍त्री राखीव गटातून तिडके सुरेखा अंकुश (१८९) सर्वसाधारण स्‍त्री राखीव प्रवर्गातून वाघचौरे संगीता ईश्वर (२०४) मते घेऊन विजयी झाले आहेत. तिसऱ्या फेरीत सर्वसाधारण प्रवर्गातून वाघचौरे सुग्रीव ज्ञानोबा (१८२) मते घेऊन विजयी झाले आहेत.  अनुसुचित जाती स्त्री राखीव प्रवर्गातून पट्टेकर मीना गणेश (२००) मते घेवून विजयी सर्वसाधारण स्त्री राखीव प्रवर्गातून शेख आयशा मन्सूर (१४१) मते घेवून विजयी झाल्या आहेत.
 
रुई धारूर-  भागवत नाना गिरी (२९३) मते घेवून विजयी, सर्वसाधारण स्त्री राखीव प्रभातून अर्चना बालासाहेब सोळंके (३३४) मते घेऊन विजयी झाल्या आहेत. दुसऱ्या फेरीत अनुसूचित जाती या प्रवर्गातून काशिनाथ गोविंद गायकवाड (२४०) मते घेऊन विजयी झाले. सर्वसाधारण प्रवर्गातून बालासाहेब श्रीराम सोळंके (२५४) मते घेवून विजयी, सर्वसाधारण स्‍त्री राखीव मनीषा दिनकर तिडके (२७२) मते घेऊन विजयी, तिसऱ्या फेरीत सर्वसाधारण प्रवर्गातून गणपती दामोदर नांदुरे (२९९) मते घेऊन विजयी अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून प्रभावती मदन गायकवाड (३३०) मते घेऊन विजयी महिला प्रवर्गातून सुनिता विजय राठोड (३३७) मते घेऊन विजय मिळवला आहे.
 
कासारी ग्रामपंचायत -अनुसूचित जमाती प्रवर्गातून सोनवणे सिद्राम कोंडीबा (२७१) मते घेऊन विजयी झाले आहेत. सर्वसाधारण प्रभागातून बडे सदाशिव महादेव (३२६) मते घेऊन विजयी झाले आहेत. सर्वसाधारण स्‍त्री राखीव प्रवर्गातून बडे अप्रोगाबाई सूर्यकांत (३३९) मध्ये घेऊन विजयी झाले आहेत. दुसऱ्या फेरीत बडे सुनंदा महादेव (३६३) मते घेवून विजयी, सर्वसाधारण प्रवर्गातून बडे बाबासाहेब आश्रुबा (३३२) मते घेऊन विजयी, सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून घुले अलका नामदेव (३५०) मते घेऊन विजयी, तिसऱ्या फेरीत सर्वसाधारण प्रवर्गातून सय्यद सुभान रमु (३२४) मते घेऊन विजयी, महिला प्रवर्गातून बडे राणी बाई ज्ञानोबा (३८९) मते घेवून विजयी, सर्वसाधारण स्‍त्री राखीव प्रवर्गातून बडे सत्यभामा नामदेव (३४८) मते घेऊन विजयी, 
चौथी फेरी मध्ये स्त्री राखीव प्रवर्गातून उघडे पूजा धम्मपाल (१७३) मते घेवून विजयी,  राखीव प्रवर्गातून जाधव गिरजाबाई प्रभू (१६६) मते घेवून विजयी.
 
विजयी उमेदवारांना मिरवणूकीस बंदी घालण्यात आल्याना अतिशय शांततेत चारही ग्रामपंचायतीचे निकाल घोषित करण्यात झाले. निवडणूक विभागाचे कामकाज नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी  निरीक्षक सुरेखा धस यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Advertisement

Advertisement