बीड-स्थानिक गुन्हे शाखेतून उचलबांगडी झालेले (beed police) पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्याकडे आता पोलीस कल्याण अधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे.यासोबतच पोउनि शैलेश जोगदंड यांची शिवाजीनगरमधून केज येथे बदली करण्यात आली.(beed police)पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी ही ऑर्डर काढली आहे. स्थानिक गुन्हे शाखेत संतोष साबळे यांची कारकिर्द वादग्रस्त राहिली होती.बीडच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यावर लाच प्रकरणात गुन्हा दाखल झाले होते.त्यांच्याबाबतीत तक्रारी वाढल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्याकडे देण्यात आली होती. त्यावेळीपासून संतोष साबळे नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. आता अखेर पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी संतोष साबळे यांना पोलीस कल्याण अधिकारी पदाचा पदभार सोपविला आहे.(beed police) तर शिवाजीनगर ठाण्यातून पोउनि शैलेश जोगदंड यांना केज ठाण्यात नियुक्ती देण्यात आली.