Advertisement

मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणारच

प्रजापत्र | Sunday, 29/09/2024
बातमी शेअर करा

बीड दि.२९ (प्रतिनिधी)-  दसरा मेळाव्याची महाराष्ट्रात मोठी परंपरा आहे.शिवतीर्थावरील शिवसेनेचा दसरा मेळावा असो किंवा भगवानभक्ती गडावरील (सावरगाव घाट) पंकजा मुंडे यांचा मेळावा असो यात आता आणखी एका मेळाव्याची भर पडली आहे. ती म्हणजे यावर्षीपासून नारायण गडावर मनोज जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळावा होणार आहे.

 

 मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे नारायणगडावरून रणशिंग फुंकले असून जरांगेंनी या बैठकीत तशी घोषणा केली. या मेळाव्याच्या नियोजनाची बैठक आज (दि.२९) रविवार रोजी नारायणगडावर पार पडली.  या बैठकीसाठी मराठा कार्यकर्त्यांची,समन्वयकांची मोठी हजेरी होती. या बैठकीमध्ये कोणत्या ठिकाणी हा दसरा मेळावा होईल त्या ठिकाणी आलेल्या लोकांची बसण्याची व्यवस्था असेल त्यानंतर पार्किंगची व्यवस्था असेल अशा सगळ्या कामाचे गावानिहाय वाटप या बैठकीमध्ये करण्यात आले आहे. आज दुपारी तीन वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात होते. या  बैठकीतच मनोज जरांगेंनी हा निर्णय घेतला आहे.

Advertisement

Advertisement