Advertisement

तीन दिवसांत करा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

प्रजापत्र | Saturday, 28/09/2024
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात (Beed District) तीन वर्षाचा (Three years) कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या तीन दिवसांत बदल्या करण्याचे आदेश मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Chief Election Commissioner of India rajiv kumar) यांनी आज (दि. २८) दिले आहेत. त्यानुसार वडवणी,शिरूर, दिंदृड पोलीस ठाण्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसह काही अधिकारी जिल्ह्यातून बदलीसाठी पात्र ठरत असल्याचे समोर येते.पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ आता या ठाण्यात कोणाला नियुक्ती देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार असून येत्या तीन दिवसांत या बदल्या पूर्ण करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने आदेश पारित केले आहेत.
    बीड जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यात मोठयाप्रमाणावर चालढकल करण्याची पद्धत रूढली आहे.अनेक अधिकाऱ्यांना बदली कालावधी पूर्ण झाल्यानंतर ही प्रमुखांच्या आशिर्वादामुळे बदलीपासून संरक्षण मिळते. मात्र जिल्ह्यात दीड महिन्यापूर्वी दाखल झालेले पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी पोलीस दलाच्या कारभारातच पारदर्शीपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या निकषानुसार जे अधिकारी बदलीसाठी पात्र आहेत त्यांची नावे कळविण्यात येणार का हे पाहणे महत्वाचे ठरेलं. मिळालेल्या माहितीनुसार शिरूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश ध्रोकट, वडवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमन सिरसाट, दिंदृड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आण्णाराव खोडेवाड या प्रभारीसह सपोनि संतोष मिसळे,सपोनि रत्नाकर घोळवे,सपोनि आनंद कांगूणे,सपोनि महेंद्रसिंग ठाकूर,सपोनि विजयसिंग जोनवाल,पोउपनि राजेश पाटील या अधिकाऱ्यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ निवडणूक आयोगाच्या निकषाप्रमाणे पूर्ण झाला असल्याचे कळते. त्यामुळे आता या अधिकाऱ्यांच्या जिल्हाबाहेर बदल्या होतात का? पोलीस अधिक्षक काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार असून येत्या तीन दिवसांत पोलीस दलात घटनाघडमोडीना चांगलाच वेग येणार आहे
.

Advertisement

Advertisement