बीड दि.२३ (प्रतिनिधी)-येथील जिल्हा(beed civil hospital) रुग्णालयात एका डॉक्टराला धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्याप्रकरणी बीड(beed police) शहर पोलिसांनी सोमवारी (दि.२२) पहाटे ५ च्या सुमारास मनसेच्या बीड शहराध्यक्ष करण लोंढेला अटक केली होती.यानंतर त्याला(beed) बीडच्या न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश पाटील यांनी आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.मस्तवाल आणि मग्रूर असलेल्या करण लोंढेला पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी कायद्याचा चांगलाच धडा शिकवला असल्याचे कळते.
बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी स्वतः जिल्हा रुग्णालयातील व्हायरल व्हिडिओची दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार संदीप सानप या पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करण लोंढे व मनसे पदाधिकारी श्री.कदमवर गुन्हा दाखल करण्यात आला.शनिवारी रात्री बीडच्या जिल्हा रुग्णालयात कार्तिक नावाच्या डॉक्टराला मनसेचे शहराध्यक्ष करण लोंढे व अन्य पदाधिकाऱ्यांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली होती.या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील रेसिडंट डॉक्टर रुग्णालय सोडून जाण्याच्या मानसिकतेत आले होते.अनेकांनी आमच्या सुरक्षेची काळजी घ्या तेंव्हाच आम्ही वैद्यकीय सेवा देऊ अशी भूमिका ही घेतली होती.दरम्यान शहर पोलिसांनी याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे.शनिवारी रात्री मद्यपान करून त्या डॉक्टरला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी धमकविण्यात आल्याच्याही चर्चा होत्या.यापूर्वीही लोंढेने बीडच्या नगरपालिकेत सीईओ नीता अंधारे यांच्या दालनातही तोडफोड केली होती.तर काही खाजगी लॅबवाल्यांना देखील लोंढेने दमदाटी करून वेठीस धरल्याच्या प्रकाराच्या चर्चा होत्या.अखेर (beed police) बीड शहर पोलिसांनी लोंढेला सोमवारी पहाटे ताब्यात घेतले आहे.आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.या कारवाईत एपीआय राठोड,श्री.सिरसाट,मनोज परजने,अशपाक सय्यद यांचा सहभाग होता.
भाईगिरी करणाऱ्यांना थारा नाही-बल्लाळ
मनसे शहरप्रमुख करण लोंढे व त्याचे साथीदार मागील काही काळापासून आंदोलनाच्या नावाखाली सामान्यांना वेठीस धरत होते.नगरपालिकेतील मनसेने केलेले आंदोलन चुकीच्या पद्धतीचे होते.दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात एका निवासी डॉक्टरला झालेली शिवीगाळ व मारहाण कायद्याचे उल्लंघन करणारी आहे.भाईगिरी करणाऱ्यांना व कायदा मोडणाऱ्यांना यापुढे पोलिसांकडून कसल्याही प्रकारची थारा मिळणार नसल्याचे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी म्हटले आहे.