Advertisement

 पितृपक्षाच्या कार्यक्रमात २३ जणांना विषबाधा

प्रजापत्र | Saturday, 21/09/2024
बातमी शेअर करा

केज दि.२१ (प्रतिनिधी )-  तालुक्यातील उंदरी या गावात (दि.२१) रोजी पितृपक्षाच्या कार्यक्रमात अन्नातून २३ जणांना (poisoning) विषबाधा झाली. या सर्वांवर धारुर ग्रामीण रुग्णालयात (Hospital) उपचार करण्यात आले असून सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. शशांक वाघमारे यांनी दिली.

 

 

 सविस्तर माहिती अशी की, केज  (kaij) तालुक्यातील उंदरी येथे ठोंबरे परिवारात शनिवार (दि.२१) रोजी पितृपक्षाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाच्या जेवणातून २३ जणांना विषबाधा झाली. बाधित रुग्णांना तात्काळ धारुर  (Dharur) येथील ग्रामीण रुग्णालयात  (Hospital) दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिक्षक डॉ. शशांक वाघमारे यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. गोरख मोरे, डॉ.विजयकुमार सूळ, डॉ.परवेज शेख, डॉ. दत्तात्रय जाधव यांनी रुग्णांवर उपचार केले. सर्व (poisoning) विषबाधितांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ.वाघमारे यांनी दिली.

Advertisement

Advertisement