Advertisement

विसर्जन मिरवणूकीत तरूणावर प्राणघातक हल्ला

प्रजापत्र | Wednesday, 18/09/2024
बातमी शेअर करा

बीड दि.१८ (प्रतिनिधी) शहरातील पेठ बीड भागात काल सायंकाळी विसर्जन मिरवणूकी दरम्यान दोन गटात वाद झाला. यावेळी एका गटातील पाच ते सहा जणांनी दुसऱ्या गटातील तरूणावर कट्यारीने हल्ला केला.

यामध्ये सदरील तरूण गंभीररित्या जखमी झाला असुन त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सहा जणांविरूध्द पेठ बीड ठाण्यात आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रविवार पेठ येथील रविंद्र यशवंतराव काजळे (वय ४४) यांना पाच ते सहा जणांनी कट्यारीने पोटावर मारून जखमी केले. त्याचबरोबर शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. यामध्ये रविंद्र काजळे जखमी झाले असुन त्यांच्यावर जिल्हारूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात काजळे यांच्या जबाबावरून रोहन संजय गुणवंत, किरण सुखदेव कांबळे, अक्षय सुनिल गुणवंत, गणेश सुनिल गुणवंत, बालाजी सुनिल गुणवंत, सुनिल सुर्यभान गुणवंत यांच्याविरूध्द पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक फौजदार आवचार करीत आहेत.

Advertisement

Advertisement