परळी वैजनाथ दि.१५ (प्रतिनिधी)- शहरातील बिलाल प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीस शाळेत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणार्या नराधम शिक्षकांकडून एका बारा वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.या प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात शिक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती नुसार शहरातील मलिकपुरा भागात असलेल्या बिलाल प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचा त्याच शाळेतील शिक्षक साजीद सलीम शेख याने शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या ड्रेस मध्ये हात घालून पाठीवर व बगलेत हात फिरवला तसेच ती वाचन करीत असताना तिच्या बोटावर बोट ठेवून हात पकडून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला.शिक्षण क्षेत्रात एका बाजुला गुड टच -बॅड टच चेक धडे देणाऱ्या शिक्षकांकडून या पध्दतीने शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीस बॅड टच करण्याचा किळसवाणा प्रकार परळी शहरात घडला आहे.या प्रकरणी अल्पवयीन मुलीचे वडील यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात राणी उशीरा गुरव न 141/2024 कलम 74,75,79 भारतीय न्याय संहिता व कलम 8,12,पोस्को अधिनियम 2012 नुसार शाळेतील शिक्षक साजीद सलीम शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात अंबाजोगाई पिंक पथक अधिक तपास करीत आहे.